ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनतर्फे नवरात्रोत्सव २०२२ अंतर्गत माऊली रास दांडिया हा तीन दिवसीय कार्यक्रम माझ्या वाघोली येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आला होता.
दिनांक ३० सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ या तीन दिवसाच्या कालावधीत सायं. ०५ ते १० वाजेदरम्यान मोठ्या उत्साहात सदरील रास दांडियाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्सवाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमास प्रमुख आकर्षण म्हणून दि. ३० सप्टेंबर रोजी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ स्टार प्रवाह फेम गिरीजा प्रभू (गौरी) व मंदार जाधव (जयदीप), ०१ ऑक्टोबर रोजी सिने अभिनेते आदिनाथ कोठारे व ‘देवमाणूस’ या मालिकेतील डॉक्टरांची भूमिका साकारणारे किरण गायकवाड तसेच ०२ ऑक्टोबर रोजी ‘तुझ्यात जीव रंगला’ झी मराठी फेम हार्दिक जोशी (राणादा) व अक्षया देवधर (अंजली) यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
यावेळी स्वरगंधा लाईव्ह म्युझिकल ग्रुपने आपल्या तालावर सर्वांना थिरकण्यास भाग पाडले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी दर दिवशी उत्कृष्ट वेशभूषा आणि बेस्ट डान्स, प्रश्नमंजुषा खेळातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही वितरित करण्यात आली.