निर्धार शिरूर हवेली मतदारसंघाच्या विकासाचा, जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा..

विधानसभा निवडणुकीत शिरूर हवेली मतदारसंघातील समस्त नागरिकांनी विश्वास दाखवून मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्या संधीचे सोने करून निश्चितच जनतेच्या मनातील विकास साधण्यासाठी सदैव एक लोकप्रतिनिधी या नात्याने कटिबद्ध भूमिका घेत राहील अशी ग्वाही देतो. आपली साथ आणि आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिले आहेत. यामुळेच मला जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. अशीच साथ यापुढेही राहू द्या हिच विनंती!

आरोग्य

वाघोली परिसरातील नागरिकांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा, कोविड काळात ५०००० हुन अधिक नागरिकांना स्वखर्चातून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, परिसर सॅनिटायझेशन सारख्या अनेक सेवा पुरविल्या.

महिला सक्षमीकरण

महिला बचत गटाच्या माध्यमातून ३०००० हुन अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. १००० महिलांना पीठ गिरणी व शिलाई मशीन चे वाटप केले.

सांस्कृतिक

वाघोली परिसरातील ५०००० भाविकांना मोफत उज्जैन, काशी, अष्टविनायक, तिरुपती बालाजी, मोहटादेवी यात्रा.

अन्नधान्य वाटप

परिसरातील गरजू व्यक्तींना व महिला बचत गटाच्या सदस्यांना माऊली आबा कटके मित्र परिवार व माऊली
फाऊंडेशनच्या वतीने अन्नधान्य वाटप
करण्यात आले.

सामाजिक योगदान

केंद्र सरकार, राज्यसरकार व पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांचा लाभ परिसरातील नागरिकांना
मिळवून दिला.

शैक्षणिक

शिरूर व हवेली विधानसभा गटातील १० वी व १२ वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ, करिअर मार्गदर्शन मेळावा, मतदारसंघातील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून मोफत शालेय साहित्याचे वाटप तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करून प्रोत्साहन देण्याचे काम

सोशल नेटवर्क

Like Page on Facebook
Follow on Instagram
Follow on Twitter