शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची मोफत कार्यशाळा

शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची मोफत कार्यशाळा

ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू माती गणपती मूर्ती बनविण्याची मोफत कार्यशाळा वाघोली येथील अभिषेक कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शकांकडून मूर्ती बनविण्याबाबत व रंगविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा या अनुषंगाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला असून या कार्यशाळेसाठी जवळपास ५०० मुलांनी सहभाग नोंदवला आणि सर्वांनी गणपतीची मूर्ती कशी बनवावी हे संबंधित तज्ज्ञांकडून शिकून घेतले.
या कार्यशाळेत मूर्ती बनविण्याकरिता लागणारी शाडूची माती देखील फाऊंडेशन मार्फतच पुरवण्यात आली होती. या अनोख्या उपक्रमातून पर्यावरणाचा समतोल राखला जावा हा महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विशेष म्हणजे पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्याची सवय लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवली जावी, जेणेकरून पर्यावरणाची होणारी हानी टळेल हा देखील एक महत्त्वाचा उद्देश या कार्यशाळेमागील होता.
याप्रसंगी माजी सरपंच श्री. वसंत काका जाधवराव, श्री. संग्राम जाधवराव, श्री. भगवानराव जाधव, श्री. अनिल सातव पाटील, श्री. कुणाल दादा जाधवराव, श्री. पोपटशेठ दळवी, प्रशिक्षिका सौ. मीनल पुरंदरे तसेच ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनचे सर्व सभासद तसेच परिसरातील अनेक मुलांसह त्यांचे पालक उपस्थित होते.

Leave a comment