ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वाघोलीतील १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ.अशोक भोसले (मा. शिक्षण सहसंचालक शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मा. प्राचार्य व्ही. एस. सातव हायस्कूल वाघोली श्री. निंबाळकर नानासाहेब कृष्णा व प्राचार्य व्ही. एस. सातव हायस्कूल वाघोली श्री.अजिनाथ ओगले यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन मोलाचे असे होते. वाघोली शाळेत झालेल्या या गौरव समारंभास २०० पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना कौतुकाची थाप देण्यात आली.
यावेळी १० वी मधील कु. अनमोल पांड्ये या विद्यार्थ्याला व १२ वी मधील रीनाम पंजवानी या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल लॅपटॉप भेट देण्यात आला व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब, तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल व चौथा क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच व इतर सर्व विद्यार्थ्यांना Wrist वॉच देण्यात आले. तसेच वाघोली परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपही करण्यात आले.
मा. शिक्षण सहसंचालक शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ.अशोक भोसले, मा. प्राचार्य व्ही. एस. सातव हायस्कूल वाघोली श्री. निंबाळकर नानासाहेब कृष्णा व प्राचार्य व्ही. एस. सातव हायस्कूल वाघोली श्री.अजिनाथ ओगले, वाघोली गावचे माजी उपसरपंच श्री. राजेंद्र अण्णा सातव, माजी सरपंच सौ.जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच श्री.वसंत काका जाधवराव, माजी उपसरपंच श्री.समीर भाडळे, माजी उपसरपंच व जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.रामकृष्ण सातव, माजी उपसरपंच श्री.मारुती आणा गाडे, सामाजिक कार्यकर्ते श्री.सुनील चाचा जाधवराव, वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री.बाळासाहेब सातव गवळी, पुणे जिल्हा युवासेना अध्यक्ष श्री.मछिंद्र सातव, भाजपा यु. मो.अध्यक्ष श्री.अनिल सातव, शिवसेना वाघोली शहर प्रमुख श्री.दत्ता बेंडावले, सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश गोगावले, सामाजिक कार्यकर्ते श्री.विकास शिंदे, उपतालुका प्रमुख शिवसेना श्री.बाळासाहेब गोरे, श्री.मोसीम आबा शेख, श्री.संदीप तात्या शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्री. सागर गोरे व श्री. सुधीर दळवी उपस्थित होते.