प्रो बास्केटबॉल लीग

प्रो बास्केटबॉल लीग

ज्ञानेश्वर कटके सोशल फाऊंडेशन आणि सुरेंद्र पठारे फाऊंडेशन तसेच पुणे जिल्हा बास्केटबॉल असोशिएशनतर्फे आयोजित आणि खराडीतील कै. राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियम येथे पार पडत असलेल्या एबीसी प्रो बास्केटबॉल लीग स्पर्धेचा अंतिम सामना शनिवार ९ एप्रिल रोजी खेळला गेला. या अंतिम स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नीरज चोप्रा यांचे कोच श्री. काशिनाथ नाईक उपस्थित होते. या चुरशीच्या सामन्यात प्रत्येक खेळाडूने पूर्ण जीव ओतून खेळी केली. यावेळी प्रेक्षक वर्गाने देखील सामन्याचा आनंद घेत स्टेडियम मध्ये जल्लोष निर्माण केला.

Leave a comment